सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका करून महिलांवरील अत्याचाराची उदत्तीकरण करणाऱ्या गुजरात मधील भाजप सरकारचा भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन दिले.
या प्रकरणाचा संपूर्ण देशात आक्रोश होत आहे. अशा प्रकारचा निर्णय घेताना राज्याने केंद्र सरकारची परवानगी घेतली नाही.त्यामुळे केंद्र सरकारने लक्ष घालून गुजरात सरकारने घेतलेला निर्णय रद्द करून आपले संविधानिकता येत व जपले पाहिजे. या ११ बलात्कारी कायद्यांची सुटका झाल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.यासारखी शर्मिंदि बाब आणखी कुठले असू शकते.मोठ्या प्रयासाने बिल्कीसला मिळालेले न्यायाच्या गुजरात सरकारने खुलेआम चिंधड्या उडून एक प्रकारे सैतानी आवृत्तीचे उदात्तीकरण केले आहे असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी वंदना धुमाळ, हसीना शेख, सविता मोरे ,जुलेखा आता ,रत्नमाला समीर ,संतोष घोरपडे, नितीन धारणे,कुणाल धुमाळ, मुन्ना बागवान, अंकुश साळेकर ,गणेश भिलारे, चेतन जाधव, आकाश कुमकर ,सुरेश कडू उपस्थित होते.