सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण हे पाण्याच्या गळतीसाठी आहे की सव्वाशे कोटीचे ठेके देण्यासाठी आहे. खालच्या शेतकऱ्यांना सांगायचं वर पाणी पाझरत आहे म्हणून खाली पाणी येत नाही. आणि अस्तरीकरणाच्या नावावर शेतकऱ्यांमध्ये भांडण लावायचं काम यांनी सुरू केलं आहे. अशी भांडणे लावण्यापेक्षा सरकारने सांगावे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी गेले कुठे? असा सवाल करून लोकांची सोय करण्यापेक्षा ठेकेदार पोसण्यात यांना रस आहे. शेतकऱ्यांच्यात भांडणे लावून लोण्याच्या गोळा पळवणाऱ्या बोक्याच्या पाठीवर काठी घातल्याशिवाय राहणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा राजू शेट्टी यांनी सांगितले.
निंबुत ता बारामती येथे केनॉल बचाव संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. सतीश काकडे, माळेगाव कारखान्याचे मा अध्यक्ष रंजन तावरे, शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले, बारामती तालुका भाजप चे अध्यक्ष पांडुरंग कचरे, जी बी गावडे, शशिकांत कोकरे, शहाजी जगताप, पी के जगताप, संजय घाडगे, कल्याण भगत, महेंद्र तावरे, विक्रम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार मदन काकडे यांनी केले