अस्तरीकरण झाल्यास शेतकऱ्याच्या घरावर नांगर फिरेल ...! अजितदादा भरणेमामा तुम्ही गप्प का? : सतीश काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डावा कालवा अस्तरीकरण लढ्यात शेतकऱ्यांची एकी नाही झाली तर शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरल्याशिवाय राहणार नसल्याचा आरोप शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे केला. 
            निंबुत ता बारामती येथे केनॉल बचाव संघर्ष मेळाव्यात काकडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, घरावर नांगर पिरवून घेयला असेल बिनधास्त फिरवून घ्या, गट तट पार्ट्या सोडा, हे काम कसं बंद करता येईल हे पाहिलं पाहिजे. अस्तरीकरण तुमच्या आमच्या मरणाचा प्रश्न आहे. राजकारणावेळी राजकारण करा. 
       तुम्ही आमच्यात कशाला पडता. तुम्ही ब्रिटिश अधिकाऱ्यापेक्षा हुशार आहात का? अशा शब्दात सतीश काकडे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र धोपडकर यांचा समाचार घेतला. अस्तरीकरण हे काम अजित पवार व दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. एवढा विरोध असतानाही हे दोन्ही नेते गप्प का? असा सवाल करून आमच्या मुळावरच उठणार असणार तर आम्ही गप्प बसणार नाही. 
        अजित दादा भरणे मामा यांच्या काळात हे काम निघाले आहे. तुम्ही ते काम थांबवणे गरजेचे आहे. 
आम्ही तुम्हाला दीड लाखाच्या लीड ने निवडून दिले आहे. आम्ही विचारसरणी बदलतो तर तुम्ही का बदलू शकत नाही. यावेळी खा. राजू शेट्टी, माळेगाव कारखान्याचे मा अध्यक्ष रंजन तावरे, शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले, बारामती तालुका भाजप चे अध्यक्ष पांडुरंग कचरे, जी बी गावडे, शशिकांत कोकरे, शहाजी जगताप, पी के जगताप, संजय घाडगे, कल्याण भगत महेंद्र तावरे, विक्रम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
सूत्रसंचालन व आभार मदन काकडे यांनी केले
To Top