तुम्ही खुर्चीत बसून 'हे' होणार सांगता....! आम्ही येथून सांगतो 'अस्तरीकरण' होऊ देणार नाही : रंजन तावरे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांचा चांगलाच समाचार घेत माळेगाव कारखान्याचे मा अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले. कन्हेरीपासून सोमेश्वर पर्यंतचा सगळा शेतकरी एकजूट होत आहे. तिन्ही कारखान्यावरील शेतकरी कृती समिती राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अस्तरीकरण विरोधात लढा उभारेल. आम्ही ऊस सोडून चवळी, मटकी लावणार नाही. ब्रह्मदेव आला तरी अस्तरीकरण होऊ देणार नाही. 
         सोमेश्वरचे अध्यक्ष सांगतात काम थांबले आहे, दुसरीकडे सांगवीत बैठक घेत अस्तरीकरण झाले पाहिजे अशी बैठक होते. शेतकऱ्याचा कळवळा असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, सबलीकरण झाले पाहिजे दुमत नाही.  मात्र कागद टाकून अस्तरीकरण होऊ देणार नाही. 
सोमेश्वरनगर पासून सुरू झालेले हे आंदोलन कान्हेरी पर्यंत तीन शेतकरी संघटनांच्या माध्यमातून लढा उभारू. 
         अस्तरीकरण विरोधात शेतकऱ्याने जागे होण्याची गरज आहे. असे तावरे म्हणाले.  यावेळी खा. राजू शेट्टी,  शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, माळेगाव कारखान्याचे मा अध्यक्ष रंजन तावरे, शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखिले, बारामती तालुका भाजप चे अध्यक्ष पांडुरंग कचरे, जी बी गावडे, शशिकांत कोकरे, शहाजी जगताप, पी के जगताप, संजय घाडगे, कल्याण भगत महेंद्र तावरे, विक्रम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सूत्रसंचालन व आभार मदन काकडे यांनी केले
To Top