सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वातंत्र्य काटेवाडीकरांना मिळालेले आहे. आपल्याला मात्र अजून स्वातंत्र्य मिळालेले नाही. अस्तरीकरण विषयावर आधी गावागावात ग्रामसभा घेऊन हरकती मागवा. आता सगळ्या गावांनी ग्रामसभेत ठराव करून अस्तरीकरणाला विरोध करावा. तसेच जर अस्तरीकरणासाठी कंत्राटदारांची वाहने कामाला लागली तर खिशात काडी पेटी घेऊन जाऊन वाहने पेटवून देऊ असा इशारा शेतकरी संघटनेचे शिवाजीराव नांदखिले यांनी दिला.
निंबुत ता . बारामती येथे केनॉल बचाव संघर्ष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मा. खा राजू शेट्टी, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, बारामती तालुका भाजप अध्यक्ष पांडुरंग कचरे, माळेगाव कारखान्याचे मा अध्यक्ष रंजन तावरे, शिवाजी नांदखिले, जी बी गावडे, शशिकांत कोकरे, शहाजी जगताप, पी के जगताप, संजय घाडगे, कल्याण भगत महेंद्र तावरे, विक्रम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक पी के जगताप म्हणाले, उचल पाण्याच्या परवानगी तुम्ही जलसंपदा मंत्री असताना दिल्या नाहीत. जर अस्तरीकरन झाले तर दुष्काळ होईल. काहिंजन दुही करत आहेत. खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली लढा यशस्वी करू. भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे म्हणाले, पांडुरंग कचरे
पवारांनी बारामतीच वाळवंट केलं, ठेकेदारांनी माणसं सोडल्यात रान उठवण्यासाठी, ज्यांना पद नाही त्यांना काम थांबवण्याचा अधिकार आहे का? असा टोला अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.