सोमेश्वर रिपोर्टर टीम --------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील पिराचा मळा येथील गोठा जळीग्रस्त शेतकऱ्याला भोर शहर भाजपाच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश मदतीचा हात म्हणून देण्यात आला असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष सचिन मांडके यांनी दिली.
भोर शहरातील पिराचा मळा येथे रविवार दि.२८ रात्री ९ च्या दरम्यान सुधीर चंद्रकांत तारू रा.भोर यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली होती. आगीत १० जनावरांचा होरपळून मृत्यू झाला होता.शेतकऱ्याला आर्थिक आधाराची गरज असल्याचे माहिती घेऊन या गोठा जळीतग्रस्ताला भोर शहर भाजपाच्या वतीने तत्काळ मदतीचा हात म्हणून २१ हजार रुपये देण्यात आले.यावेळी भाजपा महिला महिलाध्यक्ष दिपाली शेटे,सतीश शेटे, पंकज खुर्द, कपिल दुसंगे, दत्तात्रय झांजले,अमर ओसवाल,संतोष लोहोकरे, शहर महिलाध्यक्ष स्वातीताई गांधी आदींसह शहरातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.