सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी
जावली तालुक्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या बामणोली येथील कोयना जलाशयात बोटिंग करीता प्रसिद्ध असणाऱ्या भैरवनाथ बोट क्लब च्या कार्यालयाची अज्ञात व्यक्तिने बुधवार पहाटे च्या तीन ते पाच वाजण्या च्या दरम्यान कार्यालयाची तोड़फोड़ केली असून त्याच्या विरोधात भैरवनाथ बोट क्लब च्या बोट चालकानी मेढा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे
अज्ञात व्यक्तिने केलेल्या तोड़फोड़ व जाळपोळ मधे कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असून सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून विज मीटर चे देखील नुकसान केले असून इतर साहित्य कोयना नदी पात्रा मधे फेकून दिले आहे या घटने मुळे संतप्त झालेल्या बामणोली च्या ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे
गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे बंद असलेला बोट क्लब नुकताच सुरु झाल्याने बोट धारक आनंदी होते मात्र आज झालेल्या घटनेमुळे बोट धारकांच्यात अस्वस्थता असून 100च्या वर बोट चालकांचा यावर उदरनिर्वाह असून लवकरात लवकर गुन्हेगार शोधावा अशी मागणी सर्व जण करीत आहेत