सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
नवीन सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले तरी पुणे जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही.या इडी सरकारने लवकरच पुणे जिल्ह्याला पालकमंत्री द्यावा असे आग्रहाचे म्हणणे आहे.पालकमंत्री नसल्याने जनतेची सर्व कामे ठप्प झाली आहेत.सध्याच्या नवीन निष्क्रिय सरकारला सत्ता दादागिरीसाठी हवी होती सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी नाही असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
भोर येथील आढावा बैठक व पक्षातील कार्यकर्त्यांशी संवादाचे आयोजन सोमवार दि.२२ केले होते.यावेळी खासदार सुळे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून सुळे यांनी माहिती घेतली व पुढील कार्यवाहीसाठी योग्य त्या सूचना केल्या.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड,शहराध्यक्ष नितीन धारणे,जिल्हा महिला अध्यक्ष भारती शेवाळे ,तालुकाध्यक्ष विद्या यादव,माजी जि.प.सदस्य वंदना धुमाळ, चंद्रकांत बाठे, शहराध्यक्ष हसीना शेख,भालचंद्र जगताप,,मानसिंग धुमाळ ,माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,मनोज खोपडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.