सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे येथे पानशेत येथे धरणाच्या शेजारी पार पडलेल्या ऑफरोड स्पर्धेत बारामती तालुक्यातील निंबुत येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
नुकत्याच या चित्तथरारक स्पर्धा पानशेत येथे पार पडला. यामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर व सातारा येथील जवळपास ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नॅचरल ट्रोल चॅलेंजच्या वतीने या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. अभिजित काकडे यांनी अडीच किलोमीटरचा चित्तथरारक ट्रेक कमी वेळात पूर्ण केल्याने त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये वाई येथील कालिदास डोंगरे यांनी दुसरा व सातारचे गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.