सुपे परगणा ! सुपे येथे संत सेनामहाराज पुण्यतिथी साजरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे दि. २३ (वार्ताहर
बारामती तालुक्यातील सुपे येथे श्री संत सेनामहाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.  
               येथील नाभिक संघटनेच्यावतीने सिद्धेश्वर महादेव मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मंदिरात श्री संत सेनामहाराजांच्या प्रतिमेचे पुजन माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले यांच्या हस्ते करण्यात आले. तर नाभिक समाजाचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब जाधव, चंद्रकांत बारवकर आदींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.  
                त्यानंतर सेना महाराजांचे जिवन चरित्राची महती कौले यांनी दिली. यावेळी येथील मंदिरात सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम होवुन महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.                    ______________________
To Top