सोमेश्वर रिपोर्टर टीम -------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील साईसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदीरात दर्शनासाठी आलेल्या सुमारे ४०० भाविकांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. हॉस्पिटलच्या वतीने दिवसभर ही सेवा राबविण्यात आली. सलग आलेल्या सुट्यांमुळे सोमेश्वर मंदीरात तीन दिवसात जवळपास तीन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हॉस्पिटलच्या वतीने शिवभक्तांची हृदयविकार, साखर तसेच ईसीजीची तपासणी करण्यात आली. पालखी सोहळ्यातही हॉस्पिटलने वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा दिली होती.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. चैतन्य झेंडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी संध्या भुजबळ, विक्रम नलवडे, योगेश काळे यांनी भाविकांची आरोग्य तपासणी करत औषधोपाराची सोय केली.