सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सोमवार दि. 22 रोजी किर्तीकुमार सोहनलाल ओसवाल वय-34 वर्षे रा.650 गणपती आळी वाई ता.वाई यांनी पोलीस ठाण्यात रविवार दि.21रोजी सोनगिरवाडीच्या हद्दीत वाई-पाचवड रोडवर असलेल्या धुमाळ वजन काटा समोर 10,50,000/-रु.किंमतीचा एक चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा 909 मॉडेलचा टेम्पो क्र.एमएच 12एचडी 4171 हा चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती, वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने त्वरित हालचाल करून महिगाव ता.जावली या गावांत सापळा लावुन अवघ्या चार तासातच चोरीला गेलेला १० लाख ५० हजार रूपये किमतीचा टेम्पो ताब्यात घेवून मुद्देमालासह दोन चोरटे गजाआड केल्याने वाई पोलिस ठाण्यातील डिबीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, वाई पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना टेम्पो चोरीस गेलेल्या दाखल गुन्ह्याची माहिती समजताच घडल्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुमडे डिबी विभागाचे प्रमुख असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने क्षमा माने किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर या सर्वांची एकत्रीत बैठक घेऊन चोरीस गेलेल्या टेम्पोचा तातडीने तपास करण्या साठी वरील पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचार्यांचे पथक तयार करुन हातात असणारी सर्व कामे बंद ठेवून आधी टेम्पोचा गतीमान तपास करण्या साठीचे मार्गदर्शन केले .
वरील नेमलेल्या पथकातील पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचा-यांनी टेम्पोचा तपास जागो जागी सीसीटिव्ही कॅमेरेंचा आधार घेत तपासणी करत असतानाच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, यांना खास खबर्याकडून माहीती मिळाली की, चोरीस गेलेला टेम्पो व आरोपी महिगांव ता.जावली येथे आहेत.त्यानुसार पो.नि.भरणे यांनी पथकातील अधिकारी आणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के यांना मिळालेली माहिती दिली या पथकाने जावली तालुक्यातील महिगाव गाठले आणी त्या ठिकाणी आरोपी चोर वाटांनी निसटता कामा नये याची खबरदारी घेत त्या ठिकाणी गावात सापळा लावला व चोरट्यांचा शोध सुरू केला त्या वेळी महिगावातच आड बाजुला बंद पडलेल्या स्टोन क्रशर समोर टेम्पो क्र.एमएच 12 एचडी 4171 हा उभा असलेचे दिसले. तसेच टेम्पोमध्ये बसलेले दोन आरोपीही दिसले त्याच क्षणी पथकाने त्यांच्या झडप घातली पण पोलीसांची चाहुल आरोपींना लागताच दोन्ही आरोपींनी गाडीतुन बाहेर ऊड्या टाकून पळु लागले शिकार सुटता कामा नये हि जिद्द पथकातील प्रत्येका जवळ असल्याने प्रत्येक पोलिस कर्मचार्यांनी आरोपींचा चित्यथरारक सिनेमा स्टाईल पाठलाग करुन पोलीसांनी अखेर त्यांना पकडण्यासाठी यश मिळविले त्यांना ताब्यात घेऊन विश्वात घेऊन विचारले असता आम्ही टेम्पो चोरला नसल्याचे सांगितले त्यांची नावे विचारली असता त्यांनी आरोपी क्र.१ शेखर ऊर्फ चिंग्या अशोक घाडगे वय ३३ राहणार सोमजाई नगर ता.वाई तर दुसर्याने बबन केशव पवार वय ४२ राहणार महिगाव ता.जावली असे सांगितले .
वरील दोन्ही आरोपींना पोलिसी खाक्या दाखविला असता त्या दोघांनी टेम्पो चोरी करुन आणला असलेचे मान्य केले आहे.
सदर दोन्ही आरोपी शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे वय 33 वर्षे रा.सोमजाईनगर ता.वाई बबन केशव पवार वय 42 वर्षे रा महिगांव ता.जावली या दोघांना पथका कडून अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन 10,50,000/-रु.किंमतीचा टेम्पो जप्त करुन त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .वाईच्या डिबी पथकाने केलेल्या धाडशी कारवाईची बातमी वाई शहरात समजताच वाई नगरीतील नागरीकांनी पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या सह पथकातील पोलिस अधिकारी आणी पोलिस कर्मचार्यांन वर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत होते .त्याच बरोबर वाई तालुक्यातील अनेक गावातील नागरीकांचे मोबाईल वाई शहरात फिरत असताना गहाळ झाले होते अशा ३० ते ३५ नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन त्यांना परत केल्याने या डिबी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे .