सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
डोर्लेवाडी : वार्ताहर
येथील संत सावतामाळी इंग्लिश मिडीरम स्कूल पावर्ड बाय लीडच्या एच.के.जी.च्रा विद्यार्थ्रांनी अभ्यासक्रमात असणार्या स्थळ भेट उपक्रमांतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशनला भेट देत पोलिसांच्या कामाकाजाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. टंकसाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामाकाजाबद्दल माहिती दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. टंकसाळे साहेब यांनी या लहानग्यांना पोलिसांबद्दल भिती वाटू नये यासाठी अगदी सुरुवातीलाच खाऊचे वाटप केले. यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन स्टेशनमध्ये असणारे विभाग व समाजात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी करत असलेले कामाकाज याबद्दल या लहानग्यांना त्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली. पोलीस कोणत्रा प्रकारचे काम करतात, कशा प्रकारचे जेल असते, पोलीस स्टेशन कसे असते, त्यात कोणकोणते विभाग असतात, ते गुन्हेगारांना कोठे ठेवतात राची सर्व माहिती या लहानग्यांनी यावेळी समजून घेतली. पोलीस वापरत असलेल्या वेगवेगळ्रा बंदुकी, एस.एल.आर व त्रांचे प्रकार, कारागृह रासह पोलीसांच्रा कामाबद्दल या विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पोलीस निरीक्षक सुनील महाडीक व पोलीस उपनिरीक्षक श्री. टंकसाळे साहेब यांनी अगदी विद्यार्थ्यांप्रमाणेच लहान होत उत्तरं दिली. मुलांनी स्वत:ची काळजी कशी घ्रावी व अडचणीच्रा वेळी शंभर क्रमांक डायल करुन मदत कशी घ्रावी राबाबत मार्गदर्शन करण्रात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्रांना मोठे झाल्रावर काय कारयचयं याचीही उत्तरं दिलखुलास गप्पांदरम्यान जाणून घेत या क्षेत्रात रेण्रासाठी प्रोत्साहित केले. रावेळी संस्थेचे विश्वस्त अभिजित निंबाळकर, वर्गशिक्षिका सोनाली सूर्यवंशी, ज्ञानेश्वरी राऊत रांच्रासह बस चालक बापुराव खरात, आशिष कांबळे व मामा उपस्थित होते.
नकट्याला धरा......
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शक्तीपेक्षा युक्ती कशी सरस असते हे समजावून सांगण्यासाठी जंगलात चोरांच्या तावडीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची गोष्ट समजावून सांगितली. यात नकट्याला पहिल्यांदा धरा या वाक्यावर लहानग्यांनी मनसोक्त हसून आनंद लुटला. तसेच छान रंगलेल्या गप्पांदरम्यान त्यांनी या लहानग्यांसमोर गुन्हेगारांप्रमाणे बॅड बॉय होणार की पोलिसांप्रमाणे गुड बॉय होणार अशी गुगली टाकत त्यांचे गुड आणि बॅड बॉयबाबत असणारे मत जाणून घेतले व भविष्यात पोलीस होण्यासोबतच या लहानग्यांना मोठेपणी काय व्हायचयं याबाबतची मतं जाणून घेतली.
पोलीस गाडीत बसण्याचा अनुभव...
यावेळी पोलिसांच्या गाडीत बसायला आवडेल का? असा प्रश्न विचारताच या सर्व विद्यार्थ्यांनी हो म्हणून एका सुरात होकार दिला. आणि मग काय पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत व बॉनेवटवरही बसवण्यास सांगून त्यांचा आनंद द्विगुणित केला.