जावली ! शिबिराच्यामुळे नागरिकांच्यात पोलिसांविषयी आदर : सपोनि अमोल माने ! मेढा पोलिस स्टेशन मधील रक्तदान शिबिरास जावलीकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे):-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मेढा पोलिस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रम घेवून अमृत महोत्सव साजरा केला जात असून,याच निमित्ताने मेढा पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने म्हणाले,पोलिसांच्या वतीने नेहमी राबविल्या जात असलेल्या सामाजिक उपक्रमा मुळे सर्वसामान्य नागरिक व पोलिस यांच्या मधे आदराची भावना निर्माण होत असून,पोलिस व नागरिक यांच्या मधील अंतर कमी होण्यास मदतच होत आहे,

         या शिबिरास तहसीलदार राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार संजय बैलकर, गटविकास अधिकारी रमेश काळे यांचे सह जावली तालुक्यातील नागरिक, पोलीस, पोलीस पाटील ,समाजसेवक, पत्रकार यांच्यासह अनेकांनी या रक्तदान शिबिरास हजेरी लावली हे रक्तदान शिबिर मेढा पोलीस स्टेशन व अक्षय ब्लडबॉक सातारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, गोपनीय विभागाचे अमोल पवार, तसेच पोलीस पाटील सुहास भोसले,अभिजीत भोसले, कृष्णकांत महामुनी, सचिन कदम,राजेश तरडे,एकनाथ सुतार, कांबळे पाटील यांचे सह ,अक्षय ब्लड बँक मधील स्टाफ तसेच अनेक युवक रक्तदाते उपस्थित होते. उत्स्फूर्तपणे पार पडलेल्या रक्तदान शिबिरा मधे एकशे सतरा युवकांसह पोलिस कर्मचारी,ग्रामंस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला 
          यावेळी प्रत्येक रक्त दात्यास एक हेल्मेट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, जावली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुणवर्गांनी भरपूर पाऊस पडत असताना देखील मेढा पोलीस स्टेशन मधील रक्तदान शिबिरास हजेरी लावली .या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातुन कौतुक होत आहे.
To Top