सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरण दोन वेळा भरले आहे तर त्यापाठोपाठ गुंजवणी धरण देखील भरले आहे. नीरा धरण साखळीतील सर्वात मोठे असलेले भाटघर धरण सद्या भरण्याच्या मार्गावर असून आज धरणात ९२ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर दोनच दिवसात भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
भाटघर धरण क्षेत्रात २१ हजार ५०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून ९१.४९ टक्के भरले आहे. नीरा देवधर धरण क्षेत्रात १० हजार ३४४ मिमी पावसाची नोंद झाली असून ८८.१९ टक्के भरले आहे. तर वीर आणि गुंजवणी ही धरणे पूर्वीच भरली आहेत.