खंडाळा ! घरफोडी, चोरी, व वाहन चोरीतील आरोपींच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, दि.२२/ प्रतिनिधी
लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी वाहन चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक  विशाल वायकर व त्यांचे सहकाऱ्यांनी सदर घडणाऱ्या गुन्हयांबाबत गोपणीय खबऱ्यांमार्फत माहीती मिळवून व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे यातील आरोपी निष्पन्न केले होते परंतु सदर आरोपी गुंगारा देत असल्याने लवकर मिळुन येत नव्हते.

दिनांक १८ रोजी सदर आरोपी हे भोरकरवाडी, तरडगाव ता. फलटण परीसरात येणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोरकरवाडी व तरडगाव ता. फलटण याठिकाणी सहायक पोलीस निरिक्षक विशाल वायकर व त्याच्या सहकाऱ्यांनी कोंबींग ऑपरेशन राबवुन सुनिल केशव भोसले वय ४० ,रा कारकेल ता बारामती,पुणे, अंकुल रमेश भोसले वय २० ,महावीर रमेश भोसले वय २० दोघे रा. भुरकरवाडी ता फलटण जि सातारा या तीन आरोपींसह एक विधीसंघर्ष बालकास चोरी केलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडे केलेल्या गुन्हयांबाबत अधिक विचारपुस करुन त्यांच्याकडुन चोरी केलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या एकुण पाच गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक  अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधीकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोउनि. गणेश माने, स्वाती पवार, सफौ. महेश सपकाळ, पो.हवा. अविनाश नलवडे, संतोष नाळे, योगेश कुंभार, महीला पो.हवा. धायगुडे, पो.ना. सर्जेराव सुळ, श्रीनाथ कदम(तात्या), फैय्याज शेख, पोकाँ. विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, अविनाश शिंदे, अवधुत धुमाळ, केतन लाळगे, प्रिया धुरगुडे मेघा ननावरे,मनिषा शिंदे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.
To Top