पुरंदर ! खोपडेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खराडे दि.२२ (वार्ताहर)   
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपडेवस्ती (ता.पुरंदर) येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सायबेज आशा कंपनीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, वह्या, चित्रकला साहित्य, रंग पेटी, वॉटर बॅग, कंपास पाऊच ,पेन,पेन्सिल इत्यादी साहित्याचे वाटप सायबेज कंपनी यांचे वतीने करण्यात आले.
      याप्रसंगी सरपंच रमाकाका पिसाळ, उपसरपंच रुपाली गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव बोरकर, मा.सरपंच विश्वास आंबोले, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कामथे, संजय बोरकर, गजानन बोरकर, सुरेश गायकवाड, प्रमोद कामथे, चंद्रकांत बोरकर,अनिल घोलप, संतोष कामथे, पांडुरंग दौंडकर ,संपत बोरकर, बंडू बोरकर, सचिन कुतवळ, वासुदेव भगत, बशीर सय्यद, सुरेखा बोरकर, पल्लवी दौंडकर, करिष्मा शेख आदी उपस्थित होते.
     शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या सहकार्याने साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सायबेज आशा कंपनी यांचे पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सुनील कुंजीर यांनी केले तर मुख्याध्यापक विजयकुमार जाधव यांनी आभार मानले.
To Top