सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : सुनिल जाधव
वडगाव निंबाळकर नजीक कारंडे मळा, सदोबाची वाडी येथे आज कुळाची कुल स्वामीनी कोळे निवासिनी श्री लक्ष्मी माता मंदिराच्या पायापूजनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.
देवीचे आता रोज सेवा करता येणार तसेच रोज दर्शन होणार या भावनेने समस्त कारंडे मंडळी तसेच पंचक्रोशीतील भाविक भरावले आहेत. मंदिराचे बांधकाम हे लोक वर्गणीतून होणार आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री राम तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री मयूर जगणन्थ कारंडे तसेच सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी मंडळी, ग्रामस्थ यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.
सिद्धार्थ गीते, सोमनाथ होळकर, ऋषि धुमाळ,
संतोष पाटील, दादा होळकर, दीपक होळकर, नाना मदने, समस्त कारंडे मळा परिसरातील महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.