देवाला काय मागायचे असते ते ही माहित नाही......! पण त्याच्या पाया पडायचे असते....एवढंच या बालमनाला माहीत...!

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मला हा फोटो मनापासून आवडतो.कारण इथे नाटकीपणा नाही.निरागसपणा आहे. देवाला काय मागायचे असते ते ही माहित नाही पण त्याच्या पाया पडायचे असते हे या बालमनाला तेवढेच माहित...माझ्या मते ही निरागसता,सहृदयी संवेदनशीलता देवापर्यत पोहोचत असावी.कारण त्याला ही असेच भक्त हवे असावेत.खरे बोलणारे,काहीही न मागणारे..कारण देव ही आज पश्चात्ताप पावला असेल.कारण ज्या भक्ताला मागणीनुसार इच्छा पूर्ण केली आहे.तो  मूळ मानवी स्वभावावर गेला.तो माणुसकी विसरला.श्रीमंतीच्या मखरात स्वतःला हरवून बसला.माणसाने माणसासारखे वागावे हे विसरुन गेला.बुद्धीजीवी माणूस प्राण्यासारखा वागू लागला.तृष्णा आणि असक्ती यात गुरफटून गेला त्यामुळे तो स्वतःवर दुःख आणि संकटे ओढवून घेऊ लागला.त्याने त्रस्त झाल्यावर तो देवाचा धावा करु लागला.त्याने परिमार्जन केले पाहिजे ही अपेक्षा ठेवू लागला पण स्वतःच्या कृत्याकडे सोयीस्कर डोळेझाक करु लागला.जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...हे त्याला मान्य नाही तो फक्त देवावर भार टाकू लागला पण हे देवाला मान्य नाही.तुला तुझ्या कर्माची फळे भोगावीच लागतील असे अव्यक्तपणे तो निक्षून सांगतो पण तो आवाज यांच्यापर्यंत न पोहोचल्याचा हा बहाणा करतो व देवावर ओझे टाकत राहातो.नको त्याचा कसलाही भार वाहण्याला तो काही हमाल नाही मात्र निखळ, सात्विक, पावित्र्य,निरागसता,अंतरिक अनामिक ओढ असलेल्या भक्तांसाठी तो न सांगता धावून येतो हे आजच्या पिढीला संत जनाबाई,चोखोबा, गोरोबा, बहिणाबाई, कान्होपात्रा, नामदेव, एकनाथ, तुकाराम ही भक्त मंडळी अनुभवाने सांगून जातात..आपली भक्ती सिद्ध करतात म्हणून मला हा सर्व विचार केल्यानंतर या फोटोतील निरागस बालमनाचा भक्त बरंच कांही सांगून जातो.त्याची भक्तीची ओढ मनाला स्पर्श करुन जाते.त्याने असेच भक्तीच्या संस्काराने मोठे व्हावे.आदर्श नागरिक व्हावे.सहृदयी समाज निर्मिती करावी..हरवत चाललेली माणुसकी निर्माण करावी ही या भावी भक्तांकडून विनम्र अपेक्षा.. आणि हे पाहण्याचे भाग्य त्या सोमेश्वराने आम्हाला द्यावे लिनतेची मागणी...
--------------
श्री.एस.एस.गायकवाड सर करंजेपूल मो.नं.7768098296
लेखक सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत
To Top