सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
भोरला नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक १,२ व ३ मधील २६९ विद्यार्थ्यांना राजगड ज्ञानपीठाच्या मानस सचिव स्वरूपा संग्राम थोपटे यांनी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप केले.
नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वरूपा थोपटे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हरणस्कर, मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, नगरसेवक सुमंत शेटे, अमित सागळे, गणेश पवार ,आशाताई रोमन ,पद्मिनी तारू आदींसह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.