सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पावसाळा आणि हिवाळा ऋतू म्हटलं की राज्यातील भोर तालुक्यातील पर्यटनस्थळे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेली असतात. विशेषता पर्यटन स्थळांना श्रावण महिन्यातील सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून पर्यटक मोठी गर्दी करीत असतात. यातीलच एक पर्यटन स्थळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला या किल्ल्यावर पर्यटकांनी तालुक्यात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीतील वर्षाविहारासाठी रविवार दि.१४ मोठी गर्दी करून आनंद लुटला.
तालुक्यातील भाटघर धरण,नेकलेस पॉईंट, नीरा- देवघर धरण ,आंबवडे येथील झुलता पूल ,रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ला,भोर शहरातील राजवाडा तसेच महाड पंढरपूर मार्गावरील वरंधा व आंबाडखिंड घाटातील धबधबे दरवर्षी पावसाळा सुरू होताच पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावत असतात.यंदाही ही डोंगर रांगा मधील पर्यटनस्थळे खुलून गेली आसल्याने येथे पर्यटकांची पर्यटनासाठी गर्दी होत आहे.