सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे):-
जावली तालुका दुर्गम आणि डोंगराळ असला तरी या तालुक्यात नररत्नांची खाण असून विविध क्षेत्रात अनेकांनी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे देशसेवेसाठी तालुका आघाडीवर असून तालुक्यातील अनेकजण सैन्यात भरती होऊन देशसेवा करत आहेत तर तालुक्यातील अनेक शूर वीरांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे अशा शहिदांचा व माजी सैनिकांचा तालुक्यातील जनतेला अभिमान आहे जावली तालुक्याला सैनिकी शूर वीरांचा इतिहास आहे तो कायम रहावा असे प्रतिपादन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे त्या निमित्त तालुक्यातील माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार समारंभात पोळ बोलत होते यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे,नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार,नायब तहसीलदार संजय बैलकर,सपोनि अमोल माने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान मोहिते,भूमी अभिलेख अधीक्षक तुषार पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रंजनसिंह परदेशी,सामाजिक वनीकरणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे,पशुधन विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल घोडके आदी मान्यवर उपस्थित होते
गटविकास अधिकारी रमेश काळे म्हणाले जावली तालुक्याला देशसेवेची परंपरा लाभली आहे पहिल्या महायुद्धात या तालुक्यातील नऊ जवानांनी अतुलनीय पराक्रम गाजवला होता तर तालुक्यातील अनेक जवान देशासाठी शहीद झाले आहेत त्याचा तालुक्यातील जनतेला गर्व आणि अभिमान वाटतो भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर देशातील जनतेत उत्साह दिसून येत आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने जावली तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर, तालुकाध्यक्ष यशवंतराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
. सदर कार्यक्रमांमध्ये शासकीय पुनर्नियुक्त माजी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर तसेच माजी उपाध्यक्ष रमेश माने आणि जावली तालुक्याचे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यशवंत शिंदे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश जाधव यांनी केले तर नायब तहसिलदार संजय बैलकर यांनी आभार मानले