सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
आज दि. १४/०८/२०२२ रोजी पहाटे ०४/०० वा. चे सुमारा निरा शहरात पेट्रोलिंग करीत असताना सहा. फौजदार सुदर्शन होळकर यांना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, आयशर कंपनीचा आयशर टेम्पो . एम. एच १३ सी. यु ४३४५ संशयीत असा गुटखा घेवुन चाललेला आहे अशी माहीती मिळाली त्या नंतर सहा. फौजदार सुदर्शन होळकर यांनी सदरची माहीती पोसई नंदकुमार सोनवलकर यांना कळविले लागलीच आम्ही पोलीस स्टाफ हे सरकारी वाहनाने मोरगाव रोडणे सदर आयशर टेम्पोचा पाठलाग करुन गुळूंचे गावचे हद्दीत रुपाडीचामाळ येथे चढावर त्या टॅम्पोस थांबवुन ड्रायव्हर यांचेकड चौकशी केली असता व त्यांचे नावे व पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) दावलमलीक हुसेनसाब चौधरी वय २१ वर्षे रा. जकळवेट्टी ता. अथणी जि.बेळगाव राज्य कर्नाटक व २) अरीफ हुसेन रोहीले वय ३७ वर्षे रा. मिरज ता. मिरज जि. सांगली राज्य महाराष्ट्र असे सांगीतले गाडीत असलेल्या माला बद्दल चौकशी केली असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिल्यानंतर त्यांना निरा पोलीस दूरक्षेत्र येथे आणले व सदरची गाडीची पहाणी केली असता सदर गाडीमध्ये हिरा पान मसाला नावाचा गुटखा व रॉयल ७१७ नावाची सुगंधी तंबाखु असा माल असल्याचे निदर्शनास आल्याने सदरचा माल चेक केला असता त्यामध्ये एकुण
१) २१,४५,०००/- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला हिरा पान मसाला नावाचा गुटखा
२) ११,५५,०००/- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली रॉयल ७१७ नावाची सुगंधी तंबाखु
३) १०,००,०००/- एक आयशर कंपनीचा आयशर टेम्पो नंबर. एम. एच १३ सी. यु ४३४५ जु.वा. कि
४३,००,०००/- रुपये किंमतीचा माल मिळुन आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मा.डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती मा. मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड मा.धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक मा. उमेश तावसकर यांचे मार्ग दर्शनाखाली पोसई नंदकुमार सोनवलकर, सहा. फौजदार सुदर्शन होळकर, पोलीस हवालदार संदीप मोकाशी, राजेंद्र भापकर, पोलीस नाईक नावडकर, हरिश्चंद्र करे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, होमगाड सागर साळुंखे, बापु बरकडे तसेच निरा पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर यांनी कारवाई केली.