पुरंदर ! नीरा येथील बुवासाहेबनगर मधील चार दुकाने फोडली

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : नाना लकडे
पुरंदर व बारामती हद्दीवर बुवासाहेबनगर परिसरातील काल रात्री चोरट्यानी चार दुकाने फोडत ६६ हजार रुपयांचा माल लंपास केला. 
         नीरा येथील बुवासाहेब नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी मार्केट मधील युवराज गडदरे यांच्या मालकीचे गुरुकृपा ट्रेडर्स हे किराणा दुकान फोडून १० हजार रुपये किमतीचा किराणा माल व रोख पाच हजार, शमशूद्दीन तांबोळी यांच्या मालकीचे महाराष्ट्र बिर्याणी हाऊस फोडून पाच हजाराचा माल, सोमनाथ पिंगळे यांच्या मालकीचे गारवा चायनीज चे दुकान फोडून ४ हजार ५०० रोख व  ३ हजारांचा माल, ए के फुटवेयर हे दुकान फोडून ६ हजार ५०० रुवयांचा तसेच नंदू भापकर यांच्या मालकीचे शंभू मोबाइल हे दुकान फोडून २६ हजार रुपयांचा माल लंपास केल्या आहेत.
To Top