पुरंदर ! पुणे जिल्हा बँकेच्या आर्थिक साक्षर अभियानात १ कोटी १९ लाखांची बचत : खा.सुप्रिया सुळे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक महिलेचे बँँकेत  खाते असले पाहिजे. प्रत्येक महिला आर्थिक साक्षर असली पाहिजे 
हा उद्देश समोर ठेऊन पुणे जि.म.सह.बँकेने खेडोपाड्यातील महिला आर्थिक साक्षर होण्यासाठी अभिनव योजना आखली .या योजनेत गेल्या महिनाभरात १ कोटी १९ लाख रूपयांची बचत झाली असल्याची माहिती महासंसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांनी दिली
         नीरा ( ता.पुरंदर) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात बुधवारी ( दि.२४) नाबार्ड , पुणे जि.म.सह.बँक मर्या, नीरा शाखा  व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजीटल साक्षरता अभियानांतर्गत मेळावा आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी 
 खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. 
            या वेळी पुणे जिल्हा मध्य.सह.बँकेचे चेअरमन 
प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे,  माजी आ.अशोकराव टेकवडे, 
तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, विजयराव कोलते, 
सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,  महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रेेेखाताई चव्हाण, माजी जि.प. सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुका महिलाध्यक्षा गौरीताई  कुंजीर, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडेे,  समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेश चव्हाण, राष्ट्रवादी नीरा शहर अध्यक्ष तनुजा शहा, जिल्हा बँकेचे नीरा शाखेचे विकास अधिकारी मयुर भुजबळ, शाखाधिकारी सुहास शेलार यांंच्यासह बचत गटातील बहुसंख्य महिला , बँकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
          यावेळी जिल्हा बँकेत खाते उघडल्यानंतर एटीएम कार्ड , अपघात विम्याचे संरक्षण, बचतीची सवय,  बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसायांना कर्जपुरवठा आदीची माहिती बँकेचे आर्थिक साक्षरतेचे समन्वयक सुजित शेख यांनी पथनाट्याद्वारे जनजागृती करीत  उपस्थित महिलांना दिली. 
           जिल्हा बँकेतील नीरा शाखेत आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत ३५१ महिलांनी नविन बचत खाती उघडली. त्यापैकी काही खातेदारांना खा.सुळेंच्या हस्ते एटीम कार्ड, बँक पासबुक व विम्याचे प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांच्या बँकेच्या सुविधा विषयीच्या शंकांना  खा.सुप्रिया सुळे व बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी उत्तरे दिली.
     कार्यकर्माचे सुञसंचालन जयेश गद्रे यांनी केले तर आभार नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी मानले.
-----------------------------------------------------------------------
To Top