पुरंदर ! नगरसेवक अजिंक्य देशमुख यांना जनसेवा पुरस्कार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगरसेवक अजिंक्य देशमुख यांना जनसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 
         सावंत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो . नगरसेवक अजिंक्य देशमुख यांनी पाणी, वीज, गटारे, लाईट, आदी नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला . तसेच पक्ष बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबविले ,या कार्याबद्दल त्यांना ग्रामीण संस्थेवर संचालक डॉ सुमित काकडे, जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
            यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत,पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर,सचिव प्रल्हाद गिरमे, तसेच पोपट राणे, बी के जगताप, कैलास सोनवणे, सोनबा दुर्गाडे राजाराम पिसाळ, लीना पायगुडे आदी उपस्थित होते . 
To Top