पुरंदर ! नीरा ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्हीचे खा. सुप्रिया सुळेंच्या हस्ते लोकार्पण : प्राथमिक शाळेच्या इमाारतीचीही पाहणी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
महासंसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नीरा - शिवतक्रार येथील ग्रामपंचायतीने बसविलेल्या सीसीटीव्ही सुविधेचे लोकार्पण  करण्यात आलेेे. तसेच जि.प.च्या 
प्राथमिक शाळेच्या  नविन इमारतीची पाहणी खा.सुप्रिया सुळे यांनी केली.
          
        यावेळी नीरा ग्रामपंचायतीचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे,  माजी जि.प.सदस्य विराज काकडे,  जि.प.चे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण,  तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे , 
जि.प.च्या  महिला व बालकल्याण समितीच्या माजी 
सभापती रेेखाताई चव्हाण, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, अनंता शिंदे, वैशाली काळे, राधा माने, जबीन डांगे, माधुरी वाडेकर, शशीकला शिंदे, माजी उपसरपंच दिपक काकडे, विजय शिंदे ,  ग्रामसेवक मनोज डेरे यांच्यासह आदी ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 
             नीरा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून 
 सुमारे ६ लाख ४५ हजार रूपयांचा निधी खर्च करून नीरा गावातील महत्वाच्या २२ ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविले असल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे यांनी दिली. 
      दरम्यान, खा.सुप्रिया सुळे यांनी नीरा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची पहाणी केली. यावेळी उपसरपंच राजेश काकडे यांनी शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची माहिती खा.सुळे यांना दिली.
-----------------------------------------------------------------------
To Top