सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आयुष्यातील पहिली ईनिंग म्हणजे "केंद्रीय राखीव पोलीस दलातील नोकरी". जेव्हा पंजाब मधे सुवर्णमंदीर हल्ला झाला ,नागालँड ,मणीपूर, गुवाहाटी सारख्या ठिकाणी नागा -कुकी संघर्ष पेटला तेव्हा त्या त्या ठिकाणी एके ४७ पासुन हॅंड ग्रेनेड पर्यंत सर्व हत्यारासह केलेली १९९१ ते १९९६ या वर्षातील यशस्वी नोकरी. ज्यामधे मिळालेली समाधानकारक बक्षीसे ..थोड्याच वर्षाची हि नोकरी पण आयुष्यभर शिस्त शिकवणारी व देशसेवेचे समाधान देणारी
दुसरी ईनिंग ..मुक्त पत्रकारीता १९९९ साली "दैनिक सकाळ" मधे पत्रकारिता सुरु केली. अन राज्यपातळीवर एकाच आठवड्यात सलग तीन असे दै .सकाळ च्या संपादकीय पानावरचे मोठमोठे लेख ..सकाळ सह लोकमत ,दैनिक सुराज्य ,दैनिक देशदुत ,दैनिक तरुण भारत ,दैनिक प्रभात मधे काही काळ केलेली बातमीदारी व नंतर दिर्घकाळ "दैनिक केसरी" मधुन केलेले वृत्तांकन .... गल्लीपासुन राज्य व देश पातळीवर गाजलेली काही प्रकरणे हाताळुन लोकमान्य टिळकाच्या तिसऱ्या पिढीकडुन डॉ. दिपक टिळक तसेच "हिंदुस्तान टाईम्स" चे संपादक वीर संघवी ,प्रभा राव आदी मान्यवरांच्या हस्ते "दैनिक केसरी" मधे दोन वेळा झालेला गौरव माझ्या पत्रकारितेला झळाळी देवुन गेला ..
तीसरी ईनींग म्हणजे वकिली क्षेत्रातील सन २००६ सालचा प्रवेश...शिकत असताना "Land Law " व "Constitution" सारख्या विषयात मिळवलेले वैशीष्ट्यपूर्ण गुण... नंतर "Critical Appraisal of White collor Criminality In Print And Electronic Media "या वेगळ्या विषयावर प्रबंध करुन प्राचार्य डॉ.आर के पाटील ,डॉ अतुल शहाणे ,प्रा हिंतेंद्र शहा सर ,ओक सर ,फड सर ई च्या मार्गदर्शनाने " Master of Law" ची विद्या प्रतिष्ठान बारामती च्या वसंतराव पवार लॉ कॉलेज मधे घेतलेली Degree..आणी आजच्या दिवशी १४ वर्षापूर्वी "बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा 'ची घेतलेली सनद ...आणी पुढे वकिली क्षेत्रात मिळवलेले वैशिष्ट्यपूर्ण यश ...मनाला चीरकाल समाधान देणारे ठरले. १०० हुन अधिक खटले ,उच्च न्यायालयापर्यंत चे काही अपील फक्त निकाली लावले नाहीत तर सबंधिताना पुर्ण न्याय मिळवुन देवुन कोट्यावधी रुपयांच्या जमीनी वर्षानुवर्षे ईतरांच्या ताब्यात असलेल्या पक्षकाराना (मुळ मालकाना) मिळवुन देण्यात यशस्वी ठरलो. खरे तर, वकिली म्हणजे पिढ्यानपिढ्या खटले चालतात असा गैरसमज लोकानी पसरवलेला, मात्र माझ्या आयुष्यात "याची देही याची डोळा" मी पक्षकाराना न्याय मिळवुन देवुन समाधान मिळवु शकलो .फक्त दिवाणी मधे नाही तर "मोटार अपघात क्लेम" मधे ही कोट्यावधींच्या रकमा पक्षकाराना न्यायालयाद्वारे मिळवुन देण्यात यशस्वी ठरलो .लेखणी ला पत्रकारीतेचा अनुभव असल्याने १००/१५० पानाची निकालपत्रे वाचुन १००/१५० शब्दात सर्वसामान्य नागरीकाना अवगत असलेल्या शैलीत "दैनिक प्रभात" मधे व्यवस्थापक"आनंद गांधी व कार्यकारी संपादक "अविनाश भट" यांच्या सहकार्याने "कायदाविश्व" पुरवणीत दर मंगळवारी सलग तीन वर्ष लेखमाला चालु ठेवली. हे सर्व करत असताना माझ्या ज्ञानात आपोआप भर पडत गेली. पुढे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे माजी अध्यक्ष ॲड. डॉ.सुधाकर आव्हाड सरानी एक दिवस माझा लेख वाचुन दै.प्रभात मधे फोटो खाली असलेल्या नंबर वर मला फोन करुन "गणेशराव पुण्याला आल्यावर मला भेटा, खुप छान लिहिता तुम्ही तुमचे पुस्तक होईल अशी कल्पना सांगीतली" ईतक्या मोठ्या व्यक्तीने माझ्या लेखणाची दखल घेतली,अक्षरशः आनंदाने मन भरुन आले .सराना भेटलो ,भारतातील अग्रगण्य "हिंद लॉ"प्रकाशन ने पुस्तक छापण्याची तयारी दर्शवली व बारामती जिल्हा न्यायालयात "बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधाकर आव्हाड सर या गुरुवर्याच्या व सर्व न्यायाधीशांच्या उपस्थीतीत बारामती बार च्या सभागृहामधे "दैनंदिन जीवनातील कायदे " नवनवीन दुरुस्त्यासह हे सुमारे २५० उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे संदर्भ असलेले मोटार अपघात सह दिवाणी ,फौजदारी,कौटुंबिक,राज्यघटनांचे विश्लेषणात्मक माहिती असलेले हे पुस्तक प्रकाशीत झाले. फौजदारी खटल्यामधे देखील घवघवीत यश मिळाले .जन्मठेपेपर्यंत शिक्षा होवु शकणाऱ्या खटल्यात पक्षकाराना निर्दोष करण्यात यश आले. अर्थात माझेकडे आलेले पक्षकार बहुतांश जाणूनबुजून चुका करणारे नव्हते. घटस्फोटाच्या खटल्यात तर मी ८/८ वर्ष विभक्त राहणारे व घटस्फोटाचे दावे असलेले संसार जुळवुन त्याना एकत्र आणण्यात यशस्वी ठरलो. आज ही असे पती पत्नी सुखात संसार करत असुन माझ्याबद्दल मनात आदर राखतात हे मोठे समाधान मला पैशात नक्कीच मोजता येणार नाही .ज्यांचा घटस्फोट करणे गरजेचे होते,त्यांचे घटस्फोट ही केले व विशेष म्हणजे ९९ टक्के मी केलेले घटस्फोट नंतर पुन्हा नवीन जोडीदाराबरोबर विवाह बंधनात अडकले व समाधानी जीवन जगत आहेत. सुरुवातीच्या काळात पुणे ,दौंड ,फलटण ,मेढा ,कराड ,सातारा ई.कोर्टातुन अनेक फौजदारी,अपघात व दिवाणी दावे व कौटुंबिक दावे स्वत: जावुन चालवले .कोव्हीड काळात स्वत: दोन महिने मुंबई उच्च न्यायालयात जावुन मोठे यश घेवुन आलो
कोरोनाच्या काळात नवोदित व जिज्ञासू वकिलासाठी बारामती बार असोसिएशन द्वारे पदरमोड करुन ऑनलाईन पद्धतीने विविध मान्यवरांचे,विविध विषयावर लेक्चर्स घेवुन वकिलांच्या ज्ञानात भर पडणेसाठी प्रयत्न केला .गुरुवर्य व बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष डॉ.सुधाकर आव्हाड सर ,मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर सी चव्हाण सर ,दिवाणी तील जेष्ठ विधीज्ञ जगदीश धायतडक सर , बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र गोवा चे दुसरे माजी अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे सर ,बार कौंसिल चे ॲड. डॉ.उदय वारुंजीकर सर ,ॲड राजेंद्र उमाप सर ,ॲड युवराज नरवणकर सर ,सर्वोच्च न्यायालयातील ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड ॲड.अरविंद आव्हाड सर आदी मान्यवरानी कोव्हीड काळात वकिल व न्यायाधीशाना ऑनलाईन लेक्चर्स द्वारे राज्यभर मोफत मार्गदर्शन केले माझ्या ही विनंती ला मान देवुन त्यानी मी चालवलेल्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मधे विषयावर मार्गदर्शन करुन वकिल व न्यायाधीश महोदयाना ज्ञान वाटपाचे पवित्र काम केले त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत . बारामती चे ॲड.रमेश राव कोकरे सर ,ॲड. ए.व्ही प्रभुणे सर ,ॲड .भगवान खारतोडे सर ,ॲड विजयराव मोरे,ॲड.एस. एन बाप्पु जगताप ,ॲड एस .आर. ढालपे दादा ,ॲड बर्गे आप्पा ,ॲड.ज्ञानदेव रासकर,ॲड.अजित कोकरे ईत्यादीनी सतत पाठीवर हात टाकत प्रोत्साहन दिले. याशिवाय अनेक सहकारी वकील व न्यायाधीशानी मला माझ्या विधी क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत केली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार तर मानतोच पण त्यापेक्षा ऋणात राहणे पसंद करेल . त्यामुळेच कायद्याच्या क्षेत्रात मी एक यशस्वी टप्पा पार करू शकलो असे मनोमन वाटते*
बारामती विधी सेवा समितीवर काम करीत असताना आंगणवाडी पासुन वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था ज्यामधे वसंतराव पवार विधी महाविद्यालयात ,विद्या प्रतिष्ठान ईंजिनिअरींग महाविद्यालय ,वाघळवाडी येथे डी.एड.कॉलेज व आश्रमशाळा , जेष्ठ नागरीक संघ बारामती,उपकारागृह बारामती येथे कैद्याना मार्गदर्शन अशा अनेक ठिकाणी कायदेविषयक ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला .लोकन्यायालयात तसेच विधी सेवा समितीद्वारे फिरते न्यायालयात निवृत्त जिल्हा न्यायाधीशासोबत "पॅनल जज" म्हणुन अनेक खटले गावागावतले मिटवण्यात यश आले. याशिवाय गरीब व गरजुंचे अनेक खटले विधी सेवा समितीद्वारे मोफत चालवले व यशस्वी ही ठरले. याशिवाय बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर मधे तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष या नात्याने शेकडो वाद पोलीस स्टेशन व कोर्टाच्या बाहेर मिटवुन देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयाना मदत करण्याचा प्रयत्न केला .याशिवाय नियमीत सैनिकाना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन आठवड्यातील काही तास चालुच आहे.
खरे तर यश मिळाले कि माणसाची जबाबदारी वाढते त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढली आहे. "भारत सरकार" द्वारे दोन वर्षापूर्वी नोटरी म्हणून नियुक्ती झाली आहे ..त्यामुळे काम नक्कीच वाढले आहे, एखाद्या कामाची जबाबदारी घेतली तर प्रामाणिकपणे पार पाडायची अन्यथा ती जबाबदारी घ्यायची नाही असा माझा स्वभाव आहे. मला माहीत आहे माझे हे वय निवृत्तीचे अजिबात नाही मात्र ईथुन पुढे प्रापंचीक तसेच ईतर जबाबदारी मुळे कोर्ट काम कितपत करु शकेल याबाबत मनात थोडी साशंकता आहे .माझ्याकडील प्रलंबीत खटले प्रामाणिक कष्टाने पुर्ण करुन नवीन खटले सहकारी वकिलामार्फत चालवुन त्याना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न नक्की करेन ...पाहु यात येणारा काळच उत्तर देईल या प्रश्नाचे... एवढे मात्र नक्की वकिलीच्या क्षेत्रात पैशापेक्षा खुप मोठे समाधान मिळवण्यात मी यशस्वी झालो .ईश्वराचे आशीर्वाद,कुटुंबीयाची साथ व आपल्या सारख्या हितचिंतकांचे आशीर्वाद,प्रेम सदिच्छा अशाच रहावेत हिच प्रार्थना
आपला
ॲड.गणेश आळंदीकर
(नोटरी ,भारत सरकार )
(मा.अध्यक्ष बारामती तालुका ग्रा.पत्रकार संघ )
( अध्यक्ष- बारामती ता.आजी माजी सैनिक संघटना तक्रार निवारण कमिटी )
( सचीव -सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी)
( मा.विश्वस्त ..श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट ,करंजे)
लेखक हे साप्ताहिक सोमेश्वर रिपोर्टर चे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात