सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील भोर-आंबाडे, भोर-वरवडी,मांढरदेवी-भोर एसटी बस विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत येत नसल्याने भोर शहरात शाळेसाठी ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बुडत असून शैक्षणिक नुकसान होत आहे.यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
भोर शहरापासून आंबाडे, वरवडी दहा ते अकरा किलोमीटरचे अंतर आहे.वरवडी व अंबाडे परिसरातून दररोज भोर येथे शाळा- महाविद्यालयांमध्ये शेकडोंच्यावर विद्यार्थी ये-जा करीत असतात.भोर एसटी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे एसटी बस वेळेत सोडल्या जात नाहीत.यामुळे विद्यार्थ्यांच्या सकाळची शाळा सुकत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. तर दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बस स्टॅन्डमध्ये रखडून राहावे लागत आहे.भोर एसटी आगाराने व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देऊ नये तसेच शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी एसटी बसेस वेळेवर सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
COMMENTS