सोमेश्वर रिपोर्टर टिम--------
जावली : धनंजय गोरे
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मराठा व केसरी सारख्या वृत्त पत्रातून स्वराज्य निर्मिती झाली तर साहित्यकार आण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरी परंपरेतून महाराष्ट्रा बरोबर मुंबई आज सुजलाम सुफलाम झाल्याची वस्तुस्थिती असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईच्या 105 हुतात्म्यांच्या रक्तातून उभा राहिलेला महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून आदर्श कामगिरी करण्याची प्रेरणा घ्यावी असे मत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती केळघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी बोंडारवाडी धरणग्रस्तकृती समितीचे समन्वयक विजयराव मोकाशी यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव कासुर्डे,स्थानिक शालेय कमिटीचे राजेंद्र गाढवे व पत्रकार मोहन जगताप ,पोलीस पाटील मारुती पाडळे, मुख्याध्यापक दिलीप वायदंडे उपस्थित होते.
प्रारंभी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी
दीड दिवसाचा शाळेत जावून आपल्या शैक्षणिक जडणघडण करणार्या अण्णाभाऊ साठे यांच्या शैक्षणिक गुणांची गुणवत्ता जगातील अनेक देशात सुधारणावादी विचार म्हणून जोपासली जाते.त्यांनी दिलेल्या साहित्य कृतीतून प्रा.डॉ. शरद गायकवाड यांच्या सारखे वक्ते व साहित्यिक आज जगातील अनेक देशात व्याख्याने देत अण्णाभाऊ साठे यांचे विचारातून अनेक विचारवंत घडण्याचे बळ विद्यार्थ्यां वर्गात प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पत्रकार मोहन जगताप यांनी केले.
मुख्याध्यापक दिलीप वायदंडे यांनी शालेय स्थितीबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अटल टिंकरिंग लॅब सारख्या शालेय शिक्षण साहित्यातून विद्यार्थी घडतच असतात पण थोर साहित्यिकांच्या साहीत्य वाचनातून पण विद्यार्थी घडले जातात.
दत्तात्रय पवार ,मोहनराव कासूर्डे यांनी ही यावेळी विचार मांडले. प्रारंभी विद्यार्थी स्वागतपर गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले तर दत्तात्रय पवार यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मोरे यांनी करून राजकिरण अहिर यांनी आभार मानले.