नीरा खोरे बिग ब्रेकिंग ! वीर धरणातून नीरा नदीत ३३ हजार ७०० चा पाण्याचा विसर्ग : तिन्ही धरणातून वीर मध्ये पाण्याचा विसर्ग सुरू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम--- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यात दमदार पाऊस झाल्याने नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी या तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वीर धरणातून ३३ हजार ७०० ने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 
भाटघर पॉवर हाऊस मधून १५००  ने मधून व नीरा देवधर च्या पॉवर हाऊस मधून ७०० क्युसेस तर गुंजवणी मधून ६ हजार क्युसेस ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
To Top