तिरंगा उत्पादकांकडून ध्वज संहितेचा भंग ! हलके कापड, चुकीचे कटिंग व शिलाई

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. मात्र तिरंगा उत्पादकांकडून तिरंगा तयार करताना ध्वज संहितेचा भंग करण्यात आल्याचे चित्र आहे.
    राष्ट्रध्वज तयार करण्याची विशिष्ट संहिता आहे. राष्ट्रध्वज हा खादी किंवा रेशमी कापडाचा असावा असे मानक आहे. मात्र आता बाजारात पॉलिस्टर कापडाचा तिरंगा आला आहे. शिवाय ध्वजावर अनेक ठिपके आहेत. ध्वजाची शिलाई अत्यंत हलक्या दर्जाची असून अशोकचक्र ही मध्यभागी नाही. ध्वजाची कापणी करताना पुरेशी काळजी न घेतल्याने ध्वज वाकडे तिकडे झाले आहेत. शिलाई उसवली आहे. काही ठिकाणी जास्त कापड सोडले असून अनावश्यक शिलाई करण्यात आली आहे. 
  प्रत्येक घरावर तिरंगा लावणे स्वागतार्ह असले तरी तो तयार करताना ध्वज उत्पादकांनी हलगर्जीपणा केल्याने ध्वजाचे अवमूल्यन होत असल्याचे गंभीर चित्र आहे.
........
To Top