भोर ! भोरला मतदान ओळखपत्र व आधारकार्ड जोडणी विशेष मोहीम : प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांची माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यातील मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे आणि एका पेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी यासाठी मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
    या विशेष मोहिमेचे प्रशिक्षण प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देन्यात आले आहे.या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःबरोबरच इतरांनाही माहिती देवून मतदान ओळखपत्र आधार कार्ड क्रमांकाशी सलग्न करावयाचे आहे.तर तालुक्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून ओटर हेल्पलाईन ॲप वरून मतदान ओळखपत्राची आधार कार्ड क्रमांक संलग्न करावयाचा आहे.तसेच तुमच्याकडे मोबाईल ॲप उपलब्ध होत नसतील अशा मतदारांनी तहसील कार्यालयामध्ये सहाब हा ऑनलाइन फॉर्म भरून मतदान ओळखपत्र व आधार कार्ड संलग्न करून घ्यावयाचे आहे. मतदान ओळखपत्र आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत तालुक्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
To Top