भोर ! हिर्डोशी माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी  हिरडस मावळ खोऱ्यातील समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिर्डोशी ता.भोर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
     विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून भारत माता की जय,वंदे मातरम् अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली व देशाच्या अमृत महोत्सवनिमित्त जनजागृती केली.विद्यालयात वर्षभरात नवनवीन उपक्रम राबविले जातात. मुख्याध्यापिका अनिता हांडे ,उपशिक्षक सुभाष भेलके ,संतोष बुदगुडे ,सीताराम कणसे सर,मधुकर  कुडले, मानसिंग देसाई संजय डांगे तसेच शिपाई नितीन दळवी,राजू तुपे,राकेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रप्रसंगी विद्यालयातील साक्षी गोरे या विद्यार्थिनीने जनजागृती विषयी आपले मनोगत मांडले.
To Top