भोर ! शाळकरी चिमुकल्यांच्या हातावर साकारली अभ्यास मेहंदी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
    कोरोनाच्या काळात गेले दोन वर्षे शाळा बंद होत्या. यंदाच्या जून पासून शाळा नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार सुरु झाल्या.परंतु दोन वर्ष मुलांचा अभ्यास ऑनलाइन होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णतः होत नव्हता.दोन महिन्यांपासून दैनंदिन अध्यापन चालू झाल्यानंतर नाग पंचमीच्या औचित्य साधून भोर नगरपालिका शिक्षण विभाग महाराणा प्रताप प्राथमिक शाळा भोर या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका भारती गायकवाड यांनी चिमुकल्यांच्या हातावर छडी न देता आनंदातून शिक्षण देण्यासाठी मुळाक्षरे व एबीसीडीची अभ्यास मेहंदी रेखाटली.                                       उपक्रमशील शिक्षिका म्हणून नेहमीच ओळखणाऱ्या भारती गायकवाड या वेगवेगळ्या कल्पना युक्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात अग्रेसर आहेत.  कोरोना काळामुळे अध्ययन, अध्यापन प्रक्रियेतमध्ये शिक्षक व पालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शाळा पूर्व पदावर आल्यावर अध्यापन सोपे व मनोरंजक व्हावे म्हणून विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील अशी सोपी मुळाक्षरे, एबीसीडीचा सराव घेण्यासाठी अभ्यास मेहंदीच्या उपक्रम राबविला गेला.यासाठी उपशिक्षक दीपक जायवंत ,बालवाडी शिक्षिका अश्विनी धोंडे, सुवर्णा उल्हाळकर यांनी मदत केली.

To Top