सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुरुड : बाबुराव गोळे
मुरूड तालुक्यातील शिघ्रे येथील विजय अंकुश गायकर यांच्या वाड्याच्या आवारात जाळ्यात विषारी जातीचा नाग अडकून पडला होता. ही बाब लक्षात येताच विजय गायकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करुन कळविले. वनविभागाने सर्पमित्र महेश साळूंखे यांना पाचारण केले व जाळ्यात अडकलेल्या नागाला सर्पमित्र महेश साळूंखे यांनी सुखरूप सोडवुन वनखात्याच्या हवाली केले.
सदरचा नाग हा भक्ष्याच्या शोधात या ठिकाणी आला होता. अजुनही खाल्लेले भक्ष त्यांच्या पोटात होते. नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग दिसणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी नागाला जिवदान दिल्याने समाधान व्यक्त केले व अशा प्रकारे सर्प आढळल्यास न घाबरता वनखात्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सर्पमित्र महेश साळूंखे यांनी सांगितले आहे.
COMMENTS