सोमेश्वर रिपोटर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिनेकडील वीसगाव खोऱ्यातील पळसोशी ता.भोर येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांचे आशास्थान पै.अंकुश रघुनाथ म्हस्के वय 51 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुलगे, आई,भाऊअसा परिवार आहे. पैलवान अंकुश म्हस्के हे भोर तालुक्यातील नामांकित कुस्तीपटू होते.त्यांच्या जाण्याने विसगाव खोऱ्यातील कुस्ती गिरांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS