शिरोळ ! चंद्रकांत भाट ! कर्नाटक राज्यातून शिरोळ मार्गे लातूरला जाणारा बेकायदेशीर १४ लाखांचा गुटखा पकडला

Admin
 
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातून शिरोळ मार्गे लातूरला जाणारा बेकायदेशीर गुटखा व सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ यावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करून सुमारे 13
लाख 93 हजार 760 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोघां संशयीतांना ताब्यात घेतले, सदरची कारवाई बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास येथील शिरटी फाट्या शेजारील हॉटेल समोर करण्यात आली,
         याबाबत शिरोळ पोलिसांनी सांगितले की ,  शिरोळ मार्गे कर्नाटक राज्यातून गुटखा आणण्यासाठी महिंद्रा बोलोरो पिकअप या चार चाकी वाहनातून लातूर जिल्ह्यातील संशयित दोघे गेले होते, यावेळी कर्नाटक राज्यातील हिरा नावाचा गुटखा तसेच  तंबाखूजन्य पदार्थ असा सुमारे 8 लाख 93 हजार 760 रुपयाचा गुटखा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पोमध्ये भरून शिरोळ दिशेने हे वाहन येत असल्याची खबर शिरोळ पोलिसांना एका बातमीदारामार्फत कळाली, त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून शिरटी फाट्यावर थांबले असता नृसिंहवाडीहून शिरोळकडे आलेला हा टेम्पो ( क्र mh 24 ab 8166 ) पोलिसांनी अडवला , चालकाकडे अधिक चौकशी केली असता तो गोंधळून गेला, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला, अखेर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला भाजीपाला वाहतुकीसाठी असणारे प्लास्टिक कॅरेट लावले होते, तर आतील बाजूस छुपा मार्गाने ठेवलेला गुटखा व सुगंधी   सुपारी आणि  तंबाखूजन्य पदार्थ याचे  पोती आढळून आली, सदरचे वाहन पोलिसांनी जप्त करून संशयित दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता हा गुटखा व सुगंधी सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थ कर्नाटक राज्यातून लातूरकडे बंटी ( पूर्ण नाव समजू शकले नाही)  नावाच्या व्यक्तीकडे नेत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे, शिरोळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे आठ लाख 93 हजार 760 रुपयाचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ व पाच लाखाचे वाहन असे अंदाजे 13 लाख 93 हजार 760 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे,
       यामध्ये एक लाख 88 हजार 160 रुपये किमतीचे हिरा पत्तीचे 28 बॅगा तसेच हिरा पान मसाला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या 56 बॅगा त्याची किंमत सात लाख पाच हजार सहाशे रुपये इतकी आहे, तसेच 25 प्लॅस्टिकचे तुटलेले कॅरेट असा मुद्देमाल जप्त केला आहे,           
            संशयित आरोपी अमरपाशा मेहर शेख वय 28 वर्षे रा इस्लामपूर जि लातूर व रफिक महमद शेख वय 32 वर्षे रा इस्लामपूर जिल्हा लातूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे, दत्तात्रय भोजणे, पोलीस हवलदार ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला, कडुबा जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली, अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  भोजणे हे करीत आहेत,
--------------
To Top