बारामती ! अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त कऱ्हावागज मुकबधीर विद्यालयात प्रभातफेरी

Admin


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तर भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त निवासी मूकबधिर विद्यालय कऱ्हावागज या शाळेच्या वतीने "हर घर तिरंगा" या उपक्रमा अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली.या जनजागृतीपर फेरी मध्ये १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दिवशी प्रत्येकाने कर्तव्य भूमिकेतून आपापल्या घरावर ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले.
            वेगवेगळ्या घोषवाक्याच्या माध्यमातून या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी देश प्रेम व्यक्त करण्याचे आवाहन केले. या फेरीचे स्वागत कऱ्हा वागज गावाच्या सरपंच मंगल नाळे यांनी केले व आयोजन निवासी मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापक रामेश्वरी जाधव यांनी केले तसेच विशेष परिश्रम अश्विनी भोसले यांनी घेतले.
To Top