सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील नागोबाआळीतील श्रियाळ शेठच्या नागपंचमी दिवशीच्या पूजेची ७० ते ८० वर्षाची परंपरा कायम राखली गेली असून हजारो भाविक भक्तांनी श्रीयाळ राजाचे पुजा करुन दर्शन घेतले.
श्रीयाळ राजाची मुर्ती माती पासून ५ फूट उंचीची तयार केलेली असल्याने ही मूतीॕ आकर्षक दिसत होती.त्यामुळे तालुक्यातून भाविक दरवर्षी दर्शनासाठी मोठी गदीॕ असल्याची माहिती सोपान मोहिते यांनी दिली.भोर शहरातील नागोबा आळी येथील श्री नागराज तरुण मंडळ नागपंचमीनिमित्त श्रीयाळ राजाची मूतीॕ तयार करीत असते.या मूर्तीच्या पूजेची ७० ते ८० वर्षांची परंपरा आहे .नागपंचमी सणानिमित्त सकाळी श्रीयाळ राजाचा अभिषेक , पुजा, आरती , भजन , महाप्रसाद असे पूर्ण दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या सणानिमित्त दरवर्षी याञेचे स्वरूप नागोबा आळीत पाहवयास मिळत असते. श्रीयाळ राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गदीॕ केली होती. तर याञेत खेळणी, खाद्य पदार्थ यांचा आस्वाद लहान मुलांनी घेतला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास कांबळे , राजेंद्र भेलके , श्रीचंद्र मोहिते , संकेत भेलके , अक्षय मोहिते , रामदास भेलके , बाबू डिंबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
COMMENTS