वाई ! नगरसेवक किशोर बागुल यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई पालिकेचे नगरसेवक किशोर दिगंबर बागुल (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ,पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.
           ते वाई पंचायत समिती प‍ाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून ते निवृत्त झाले होते.त्यांच्या चांगल्या कामाची आमदार मकरंद पाटील यांनी घेऊन त्यांना वाई शहरात नगरसेवक या पदासाठी तिकीट दिले होते व ते निवडून देखील आले  त्यानंतर नगरसेवक म्हणून शहरात त्यांनी  चांगले काम केले.अहीर सुवर्णकार समाजाचे ते जेष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी वाई पंचायत समितीत असताना आपल्या काळात दुष्काळग्रस्त गावाना विहरी, नळ पाणी पुरवठा योजना, पाझर तलाव दुरुस्ती, मांढरदेव यात्रेकरुं साठी पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती, तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी टँकरचे नियोजन अशा विविध प्रकारच्या समाजहिताच्या ऊपाय योजना त्यांनी मोठ्या धाडसाने  केल्या होत्या 
    त्यांच्यावर रविवार पेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतविधीस राजकीय शैक्षणिक सहकारसामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते  उपस्थित होते
To Top