सुपे परगणा ! बाबुर्डी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गोरख खोमणे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
 बाबुर्डी ता.बारामती जि पुणे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि.३०/०८/२०२२ रोजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. सदर ग्रामसभे मध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समिती स्थापन होऊन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी लोकशाही मार्गाने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. सदर निवडणुकीमध्ये बाबुर्डी गावच्या पोलीस पाटील वनिता राजकुमार लव्हे यांचे पती राजकुमार किसन लव्हे, धनंजय भगवान पोमणे, सूरज बाळासो पोमणे, दादासो यशवंत लडकत, ईश्वर भिवाजी लडकत आणि गोरख नारायण खोमणे इत्यादींनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. यापैकी  धनंजय भगवान पोमणे, सूरज बाळासो पोमणे, दादासो यशवंत लडकत, आणि ईश्वर भिकाजी लडकत या उमेदवारांनी ग्रामस्थ व तरुणांच्या विनंतीवरून व आपापसात चर्चा करून उमेदवारी माघारी घेतली. राजकुमार किसन लव्हे व गोरख नारायण खोमणे यांच्यामध्ये सरळ लढत होऊन उपस्थित ग्रामस्थांच्या समक्ष एकूण १४६ ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेत आपला मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये ३ मते अवैध्य झाली तर उर्वरित १४३ मतांपैकी ५० मते गावच्या पोलीस पाटील यांचे पती राजकुमार किसन लव्हे यांना तर गोरख नारायण खोमणे यांना ९३ मते मिळाली. सदर निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत सचिव सौ. सीमा गायकवाड मॅडम यांच्या देखरेखेखाली पार पडली. यावेळी गोरख नारायण खोमणे यांची प्रचंड बहुमताने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आहे. सदर प्रक्रियेस म.गांधी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष श्री. किरण गुलाब जगताप, माजी उपसरपंच पुरुषोत्तम दादासो पोमणे, श्री. सुनील चंद्रकांत जगताप सर , श्री. भानुदास रामदास पोमणे सर .  अमोल सयाजी पोंमणे, अमोल जयराम बाराते, लक्ष्मण पोपटराव पोमणे सर .  योगेश साधू जगताप, गोविंद बाचकर, ग्रा. पं. सदस्य, महेश  बाचकर,  दत्तात्रय ढोपरे, बाबूर्डी वि.  का. से. सो. चेअरमन श्री. शांताराम ढोपरे, शामिर इनामदार, रवींद्र केदार, पोपट खोमणे, सचिन खोमणे, शेखर खोमणे, बाळासो लव्हे, लालासो पोमणे, सचिन लडकत, ग्रां. पं. सदस्य नानासो लडकत, अतुल लडकत, उत्तम लडकत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी यापुढील काळात गावातील सर्व ग्रामस्थांनी समान वागणूक देऊन कोणाच्याही बद्दल मनात आकस न ठेवता गावातील कोणताही तंटा गावाबाहेर जाऊ न देता गावातच एकत्र बसून मिटवण्याचा व गाव तंटामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करू असे विचार नवीन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गोरख खोमणे यांनी मांडले. तर गावाला एक संयमी व लोकाभिमुख नेतृत्व मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
To Top