सोमेश्वर रिपोर्टर टीम---
भिगवण : प्रतिनिधी
शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दमदाटी करीत अपहरण करून निर्जनस्थळी नेत तिचा विनयभंग केल्याची घटना भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसात ३ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि अपहरणाच्या घटना घडल्यामुळे नागरिकांची संवेदना हरवून गेलींय काय असा सवाल निर्माण होतो.
भिगवण येथील शाळेत निर्लज्ज शिक्षकाने आपल्या नातीच्या वयाच्या मुली सोबत सांगताना लाज वाटावी असे कृत्य केले.तर पोंधवडी पाटीजवळ प्रातविधी साठी जाणाऱ्या मुलीला अज्ञात नराधमाने पळवून नेल्याची घटना घडली.याचा पोलीस तपास करत असतानाच बुधवारी सकाळी पुणे सोलापूर महागार्गावर शाळेसाठी जाणार्या शाळकरी मुलीला दुचाकी वरून आलेल्या आरोपीने तू एकटी इथे काय करते ? अशी एकटीच का उभी राहिलीस असे दमबाजी करत चल मी तुला शाळेत सोडतो असे म्हणत शाळेच्या विरोधी बाजूला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निर्जन डोंगरावर नेत तिच्या मनात लज्जा उत्तपन होईल असे कृत्य केले.तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.अचानक घडलेल्या प्रकाराने गडबडून गेलेल्या पिडीतेने आरोपीच्या हातातून आपली सुटका घेत भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दिली.याप्रकरणी तक्रार दाखल होताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकाची निर्मिती करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसात ३ प्रकार घडल्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.घरी आणि शाळेत आणि जाण्याच्या रस्त्यावरही अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे यातून दिसून येत आहे.त्यामुळे समाजात संवेदना हरवून चालल्यात काय असा सवाल निर्माण होत आहे.तर समाज प्रबोधनाबरोबरच कठोर पोलिसिंग होण्याची गरज असून आरोपीला वाचविणाऱ्या पुढारी मंडळीनी यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे.