सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
एसटी विना ओझर्डे जोशीविहीर खानापुर कदमवाडी येथील विद्यार्थ्यांचे दैन दीन होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी ओझर्डे गावातील आपुलकी महिला ग्रामसंघ
स्वामिनी महिला ग्रामसंघ.मंगलमुर्ती महिला समुह . संजीवनी महिला समुह.स्मुर्ती महिला समुह .कल्पतरु महिला समुह .आस्था महिला समुह .ओमकार महिला समुह .गजराज महिला समुह .आणी समर्थ महिला समुहांचे सर्व महिला पदाधिकारी सदस्य एकत्रीत येऊन सर्वांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट वाईचे आगार प्रमुख असलेले गणेश कोळी यांच्या दालनाला धडक दिली.
महिला कार्यकत्यांनी १०० महिला पालकांच्या सह्या असलेले निवेदन देऊन सकाळी ६|४५ आणी ७|३०
वाजण्याच्या सुमारास अशा दोन एसटी बसेस
नव्याने सुरू करुन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी या वेळी महिलांनी केली आहे .या वेळी गणेश कोळी यांनी या वर तोडगा काढुन लवकरच बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन ऊपस्थित महिलांना दिले आहे ओझर्डे गावासह जोशीविहीर कदमवाडी खानापुर या गावातील प्राथमिक माध्यमिक आणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा गावच्या शेकडो विद्यार्थ्याना दररोज शालेय शिक्षणा साठी वाई या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. वाई आगाराच्या दररोज ये जा करणार्या एसटी बसेस विद्यार्थ्याना कमी पडु लागल्याने वरील गावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे नुकसान होत होते .दररोज एसटीत चढत असताना आत बस मध्ये बसलेल्या किंवा ऊभे असणार्या मुला मुलींन बरोबर खाली ऊभे असलेल्या विद्यार्थ्यांना बरोबर पुढे सरकण्या वरुन दररोज शाब्दिक चकमकी ऊडताना दिसतात पुढे त्याचे रुपांतर वाईच्या किसनवीर महाविद्यालयात किंवा वाईच्या बस स्थानका सह परिसरात तुंबळ हाणामारीत त्याचे रुपांतर होऊन अनेक विद्यार्थी जखमी देखील झालेले आहेत पुढे या हाणामारीची दिंडी थेट वाई किंवा भुईंज पोलिस ठाण्यात पोहचते अन अशा वेळी
प्रत्येक पालकांच्या पायाखालची वाळु सरकते या विद्यार्थ्यांन मध्ये ८०% टक्के विद्यार्थी हे ऊन वारा भर पाऊसात दिवसभर कष्ट करणार्या शेत मजुर आणी शेतकर्यांची आहेत हाणामारी झाल्या नंतर एक मेकांच्या सलोख्यांचे असणार्या संमधात कटुता निर्माण होते .पुढे त्याचे रुपांतर परिसरातील गावा गावांन वर्चस्व वादळांचे अड्डे तयार होऊन लहानांची असणारी भांडणे ही मोठ्यांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचतात त्याचे रुपांतर पुन्हा गावो गावच्या राजकीय पक्षांच्या गटबाजीत होताना सर्वच पालकांनी पाहिले आहे अशा वेळी म्हत्वाचा असणारा शिक्षणाचा हा बाजुलाच
राहतो आणी मग एक मेकांच्या जिरवा जिरवीचे
राजकारण सुरू होते अन दुर्दैवाने अशा वेळी समंजस पणाची भुमीका बजावणारे देखील परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल करताना दिसतात .
अशी प्रकरणे ओझर्डे जोशीविहीर कदमवाडी आणी खानापुर या गावातील विद्यार्थी आणी पालकांन मध्ये घडु नयेत सलोख्याचे संमध टिकुन रहावेत अशा चांगल्या भावनेने ओझर्डे ता .वाई येथील स्वामिनी महिला ग्रामसंघाच्या छाया फरांदे आपुलकी महिला ग्राम संघाच्या रुचीरा बांदल मंगलमुर्ती समूहाच्या शुभांगी खरात संजीवनी समूहाच्या सुनीता शेलार स्मृती समूहाच्या अनिता क्षीरसागर कल्पतरु समूहाच्या भाग्यश्री पिसाळ आस्था समूहाच्या आशा फरांदे ओमकार समूहाच्या सुजाता पिसाळ गजराज समूहाच्या कल्यानी घोरपडे समर्थ समूहाच्या कवीता कवीता फरांदे अशा सर्व महिला संघटना एकत्रीत येऊन त्यांनी मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्या साठी आणी कसलेही राजकीय पाठबळ नसताना देखील थेट वाई आगाराचे आगार प्रमुख असलेले गणेश कोळी यांची थेट भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडुन दररोज सकाळी ७|४५ .७|१५ आणी ७|३० वाजण्याच्या सुमारास जादा बसेस सोडण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे .या दिलेल्या निवेदना वर १०० पालकांच्या सह्या आहेत .
COMMENTS