सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
काल 'सोमेश्वर रिपोर्टर'ने मुरूम ता फलटण येथील बोन्द्रे वस्तीवरील सोमेश्वर विद्यालयाचा शिक्षक विद्यार्थीनीच्या वडिलांच्या उपचारासाठी धावला ...अन फलटण च्या आमदारांचा फंड पावला...! या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर समाजातून अनेक मदतीचे हात पुढे आले. फलटण चे आमदार दीपक चव्हाण यांनी सतीश संकपाळ यांच्या उपचाराची जबाबदारी उचलल्या नंतर सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विद्यानंद भिलारे व डॉ. राहुल शिंगटे यांनी एक हात मदतीचा पुढे करत संकपाळ कुटुंबातील सर्वच सदस्यांची मोफत उपचाराची जबाबदारी उचलली आहे. यामुळे परिसरातून डॉ भिलारे व डॉ शिंगटे यांचे कौतुक होत आहे.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या शाळेतील प्राची सतीश संकपाळ या विद्यार्थिनीचे वडील सतीश संकपाळ मुरूम (बोंद्रे वस्ती) ता. फलटण गेली चार वर्ष मोटार निरोन डिसीज( मसल डॅमेज) या आजाराने पीडित आहेत. या आजाराच्या औषध उपचारासाठी आजपर्यंत या कुटुंबाने पंधरा लाख रुपये खर्च केला आहे. त्यामुळे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट झाली आहे.
याची माहिती मिळताच सोमेश्वरनगर येथील साईसेवा मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलच्या प्रशासनाने सामाजिक बंधीलकी जपत संकपाळ कुटुंबातील सर्वच सदस्याचा मोफत दवाखान्याच्या खर्च उचलला आहे. तसेच समाजसेवा या व्हाट्स अप ग्रुप मधील सदस्यांनी देखील रोख स्वरूपात आर्थिक मदत दिली आहे.
----------
मुरूम येथील संकपाळ कुटुंबात सद्या घरात कोणीही कर्ता पुरुष नाही तसेच प्राचीचे वडील यांच्या दवाखान्याच्या खर्चामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने संकपाळ कुटुंबातील सर्वांचाच हॉस्पिटलचा मोफत खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. विद्यानंद भिलारे
डॉ. राहुल शिंगटे