सोमेश्वर रिपोर्टर टिम
जावली प्रतिनिधी(धनंजय गोरे)
जावळी तालुक्यातील वरोशी गावचे सुपुत्र बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले.
मंगळवारी रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी त्यांचा वाढदिवसाचा केक कापत असतानाच त्यांचे सहकारी, जावळी तालुक्यातील काही निवडक मित्रांच्या समोरच ही दुर्दैवी घटना घडली यावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विजयराव मोकाशी गेली अनेक वर्ष जावलीतील सर्व सामान्य जनतेला हक्काचे पाणी मिळावे यासाठी बोंडारवाडी धरण बांधण्याचे स्वप्न पाहणारे मोकाशी साहेब, आज सर्वांच्या डोळ्यात पाणी आणून सर्वांना सोडून निघून गेले आहेत. जावळी तालुक्यातील ५४ गावातील शेतकर्यांच्या शेतीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी जावळी तालुक्यातील ५४ गावच्या लाखों लोकांना एकत्रित करून, "पाणी हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच" असा हुंकार देत एकीची वज्रमूठ तयार करून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थी भावनेने शासनदरबारी पाठपुरावा करत व प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून समाजासाठी लढा देणारे एक संवेदनशील व्यक्तीमत्त्व होते.