सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल वर्तमानपत्राचे विक्रेते दिपक रामचंद्र गुरव यांचे वडील रामचंद्र बबन गुरव वय 78 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
वाकी चोपडज तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर काम करून सेवानिवृत्त झाले होते. चोपडज गावचे ग्रामदैवत पंचायतन मंदिराचे पुजारी होते. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे वडगाव निंबाळकर वाकी चोपडज गावांमधून ते सर्व परिचित होते. पत्नी शकुंतला, राणी, निता, भारती अशा तीन मुली मुलगा दिपक नातवांडे असा परिवार आहे.