कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन

Admin


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नवी दिल्ली : प्रतिनिधी
कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांची 42 दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंझ अखेर अपयशी ठरली आहे. 
आज दि २१ नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ५८ वर्षांचे होते. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांना दीड महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तात्कळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याचवेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. एम्स रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु होते. 
To Top