सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील वरवडी (शारताटी) ता.भोर येथे सोमवार दि.२६ शेतात महावितरणच्या लघु दाब वाहीनीच्या तार तुटून शेतात काम करीत असताना अंगावर पडून तारांचा शॉक लागून सुभद्रा सोनबा वरे वय-७५ या आजींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार समोर आले आहे.
वरवडी ता. भोर येथील सुभद्रा सोनबा वरे वयस्कर आजी सोमवार दि.२६ दुपारच्या दरम्यान शेतातील काम करण्यासाठी गेल्या होत्या.टका या परिसरातील शेतात काम करीत असताना मेन लाईनच्या तुटलेल्या तारा आजींच्या अंगावर पडून आजी जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली.रात्र होत असताना सुभद्रा वरे घरी का येईनात म्हणून गावातील काही तरुण शेताकडे पाहण्यासाठी गेले असता ही घटना तरुणांच्या लक्षात आली.