वाई ! शिरगाव मध्ये अज्ञाताकडून आंब्यांच्या झाडांची कत्तल l शेतकऱ्याचे नुकसान

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील शिरगाव ते देगाव रोडवर राहणारे शेतकरी पोपट गुलाबराव भोसले यांच्या मालकीची असणाऱ्या हापुस व पायरी जातीच्या झाडांची अज्ञाताने जाणीव पुर्वक  कत्तल केल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
            घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की 
पोपट गुलाबराव भोसले वय ५३ राहणार शिरगाव ता.वाई हे शिरगाव ते देगाव रस्त्यावरील विद्यानगर मध्ये स्वताच्या मालकीचा असणार्या गट नं.८०४ या शेतजमीनीत राहतात या शेतजमीनीत त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्वताचे पैसे घालून दापोली विद्यापिठातुन प्रत्येकी ३०० रुपये या दराने ५० 
हापूस आणी पायरी जातीची १५ हजार रुपयांची झाडे खरेदी करुन आणुन १० हजार रुपये इतर खर्च करुन त्याची लागवड केली होती हि फळबाग शेतात अतिशय कष्ट करुन 
हि ५० झाडे त्यांनी जगवली होती .गेल्या वर्षी या झाडांना भरपूर मोहर देखील आला होता व आंबे देखील आलेले होते .पण कष्टाने ऊभी केलेल्या या फळ बागेस कुणाची तरी दृष्ट लागल्याने अज्ञाताने झाडे कलम केलेल्या ठिकाणा वरच घाव घालून झाडांची कत्तल केल्याने पोपटराव भोसले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी या बाबतची 
तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात देऊन कत्तल केलेल्या अज्ञात आरोपीचा पोलिसांनी शोध घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे .
To Top